व्हॅलेटाईन विक सुरु आहे त्यामधील महत्त्वाचा दिवस म्हणून Promise Day. हा दिवस साजरा करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
कुणालाही कोणताही शब्द देताना खूप वेळा विचार करा. तुमच्या मनातील सगळे प्रश्न दूर करून आपल्या नात्याबद्दल स्पष्ट संवाद करून कोणतंही नातं स्वीकारा.
स्वतःमध्ये बदल करणे ही चांगलीच गोष्ट आहे. पण कुणासाठी तरी मी बदलेन ... हा विचार न पटणारा आहे. कुणाला बदलून त्याच्यावर प्रेम केलं जातं नाही. एवढंच नव्हे तर जो आहे, जसा आहे... तसं त्याच्यावर प्रेम करावं.
कितीही चांगल नातं असलं तरीही वाद हा होतोच. त्यामुळे मी भांडणार नाही... हे प्रॉमिस कधीच कुणाला देऊ नका. हेल्दी संवाद कायमच कौतुकास्पद असतो त्यामुळे वादाचं स्वरुप विचित्र असणार नाही याची काळजी घ्या.
आनंद हा कायमच दोन्ही बाजूकडून असणे गरजेचे आहे. एकाच व्यक्तीने याची जबाबदारी घेणे योग्य नाही. कारण आनंद देण्यात आणि वाटण्यातच खरा आनंद आहे.
आपल्याकडे कोणतंच मॅजिकल माईंड नाही... त्यामुळे कुणाच्या मनातले जाणून घेणे अतिशय कठिण आहे. अशावेळी आपल्या जोडीदाराला मी तुझ्या मनातील ओळखेन असा शब्द कधीच देऊ नका.
कुणाला शब्द देणे... आणि जर तो प्रेमाचा शब्द असेल तर त्याची मज्जाच काही वेगळी आहे. पण परिस्थिती तुम्हाला काय भविष्यात देईल याची माहिती नाही. त्यामुळे नात्यांमध्ये त्या काळात, प्रेझेंटमध्ये स्वतःला ठेवा आणि निःस्वार्थ प्रेम करा.
जोडीदाराकडून वाजवीपेक्षा जास्त अपेक्षा करू नका. कारण नात्यामध्ये तडजोड असते प्रेम असते. एकमेकांच्या नात्यावर, प्रेमावर फोकस करा. मटेरिअलिस्टिक गोष्टी महत्त्वाच्या नाहीत.
हेल्दी रिलेशनशिप मध्ये कायम एकमेकांचा आदर महत्त्वाचा आहे. अशावेळी एकमेकांना आदर प्रेम द्या. त्यामुळे उगाच मी कायमच सहमती दर्शवेन असा शब्द देऊ नका.
माणूस आहे त्यामध्ये सगळ्या भावना असतात. मग त्या आपल्या जोडीदाराबद्दलच्या भावना का असेनात? त्यामुळे जोडीदाराला नको तो शब्द कधीच देऊ नका.