नीता अंबानींचा ग्लॅमरस लूक हा कायमच चर्चेत असतो.
संस्कृतिक कार्यक्रम असो किंवा विशेष कार्यक्रम असो नीता अंबानींचा लूक लक्ष वेधून घेतो.
नीता अंबानींच्या ग्लॅमरस लूकचं श्रेय जातं मिकी कॉन्ट्रॅक्टर यांना. ए लिस्टेट इव्हेंटसाठी नीता यांचं मेकअप मिकीच करतात.
मिकी कॉन्ट्रॅक्टर हे मागील 3 दशकांपासून मनोरंजन श्रेत्रात सक्रीय आहेत.
मेकअप क्षेत्रातील नावाजलेल्या नावांमध्ये मिकी यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांनी अनेक कलाकारांबरोबर काम केलंय.
हेलन यांना टोकियोमध्ये पहिल्यांदा पाहिल्यानंतर मिकी यांनी मनोरंजन सृष्टीमध्ये काम करण्याचं ठरवलं.
1992 साली प्रदर्शित झालेल्या काजोलच्या 'बेखुदी' चित्रपटामधून मिकी कॉन्ट्रॅक्टर यांनी मनोरंजन श्रेत्रात पहिलं पाऊल ठेवलं.
दीपिका पादुकोण ते ऐश्वर्या राय आणि नीता अंबानी ते आलिया भट्ट यांच्यापर्यंत सर्वांबरोबर काम केलं आहे.
अनेक बड्या कालाकारांचा मेकअप मिकी कॉन्ट्रॅक्टर यांनी केला आहे.
'दोस्ताना', 'हम आप के हैं कौन', 'दिल तो पागर है', 'कुछ कुछ होता है' या आणि इतर अनेक चित्रपटांमधून मिकी कॉन्ट्रॅक्टर यांची कलाकारी दिसून आली.
नीता अंबानीच्या मेकअपची जबाबदारीही खास कार्यक्रमांआधी मिकीच पार पाडतात.
'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, अनुभव आणि कौशल्यामुळे मिकी कॉन्ट्रॅक्टर हे फार महागडे मेकअप आर्टीस्ट आहेत. त्यांचा एका दिवसाचे मानधन हे सामान्यांच्या 3 महिन्यांच्या पगाराइतकं आहे.
मिकी कॉन्ट्रॅक्टर एकावेळेस मेकअप करण्यासाठी 75 हजार रुपये ते 1 लाख रुपयांपर्यंत मानधन आकारतात. सरासरी 30 हजार पगार ग्राह्य धरला तर हा सर्वसामान्यांचा 3 महिन्यांचा पगार होतो.