यंदाच्या नारळी पौर्णिमेला नारळी भाताऐवजी ओल्या खोबऱ्याची नारळी पोळी बनवून पाहा
ओलं खोबरं, गूळ, मैदा, गव्हाचे पीठ, तूप किंवा तेल
सर्वप्रथम गव्हाचे पीठ आणि मैदा एकत्र त्यात कडकडीत तेलाचे मोहन घाला व 1 चमचा मीठ घालून चांगले मळून घ्या
भिजवलेली कणिक काही काळांसाठी बाजूला ठेवून द्या. त्यावर एक ओला कपडा ठेवा जेणेकरुन सुकणार नाही
त्यानंतर ओलं खोबरं आणि गूळ एकत्र करुन मध्यम आचेवर घट्ट होईपर्यंत ढवळून घ्या.
आता त्यात वेलचीपूड घालून मिश्रण चांगले एकजीव करा. आणि थंड होण्यासाठी ठेवा
आता भिजवलेल्या कणकेचे गोळे करुन छोटी पुरी लाटून त्यात नारळाचा चव भरुन घ्या आणि सर्वबाजूने बंद करुन घ्या
आता व्यवस्थीत लाटून त्याची पोळी करुन तव्यावर खरपूस भाजून घ्या.