पोर्णिमा आणि आमावस्येबद्दल खूप लोकांना माहिती असते.
पोर्णिमेला पृथ्वीवरुन पूर्ण चंद्र पाहता येतो.
तर आमावस्येला चंद्र अजिबात दिसत नाही.
पण सूपरमून काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
सूपरमून एक खगोलीय घटना आहे.
तेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.
अशावेळी चंद्र खूप मोठा आणि 14 ते 30 टक्के अधिक चमकदार दिसतो. याला पेरिगी मून म्हटलं जातं.
जेव्हा एकाच महिन्यात दोनवेळा सूपरमून बनतो.
तेव्हा त्याला ब्लू सूपरमून असं म्हणतात.
एका वर्षात 3 ते 4 वेळा सुपरमून दिसू शकतो.