नागपंचमी स्पेशलः हळदीच्या पानातील सुंगधी पातोळ्या कशा करायच्या?

Mansi kshirsagar
Aug 08,2024


नागपंचमी हा सण घराघरांत साजरा केला जातो. यादिवशी खास पातोळ्याचा नैवेद्य दाखवला जातो


हळदीच्या पानातील गरमा गरम पातोळ्या म्हणजे मेजवानीच चला याची रेसिपी जाणून घेऊयात

साहित्य

तांदळाचे पीठ, हळदीची पाने, मीठ, किसलेला गूळ, वेलचीपूड, ओले खोबरे किसलेले, तूप

कृती

एका काढाईत तूप गरम करुन घ्या नंतर त्यात किसलेला गूळ घालून वितळवून घ्या. थोड्यावेळाने यात किसलेले खोबरे घाला.


संपूर्ण सारण एकजीव करुन घ्या व पाच मिनिटे सतत परतत राहा. आता यात वेलचीपूड घालून पुन्हा परतून घ्या. तुमचं सारण तयार आहे.


आता एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तांदळाचे पीठ घ्या आणि उकड काढून घ्या. नंतर गरम असतानाच मळून घ्या.


नंतर हळदीच्या पानावर पीठाचे गोळे घेऊन पातळ थापून घ्यावे नंतर त्यावर सारण पसरवून घ्या व हळदीचे पान दुमडवून घ्या


नंतर हळदीच्या पानातील पातोळ्या पाण्याच्या वाफेवर 15 ते 20 मिनिटे शिजत ठेवा

VIEW ALL

Read Next Story