मुंबईत हटके आणि लोकप्रिय वडापाव कुठे मिळतात?

सम्राट वडापाव

मिक्स भजींसोबत मिळणारा वडापाव म्हणजे सम्राट वडापाव. हा वडापाव विले पार्ले येथे मिळतो.

लक्ष्मण वडापाव

घाटकोपर पूर्व भागात लक्ष्मण वडापाव मिळतो. लक्ष्मण वडापाव जैन वडापावसाठी देखील प्रसिद्ध आहे.

भाऊ वडापाव

भाडूंपमधील फेमस वडापाव सेंटर म्हणजे ‘भाऊ वडापाव’. वाल्मिकी नगर या परिसरात हा वडापाव मिळतो.

कुंजविहार वडापाव

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला मिळणारा वडापाव म्हणजे कुंजविहारचा वडापाव. हा वडापाव मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव पैकी एक आहे.

आनंद वडापाव

विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस मिठीबाई कॉलेजच्या समोर आनंद वडापाव मिळतो.

गजानन वडापाव

चटणीसाठी लोकप्रिय असणारा वडापाव म्हणजे ठाण्यातील गजानन वडापाव. हा वडापाव ठाणे स्टेशनच्या पश्चिमेस मिळतो. हा वडापाव खाण्यासाठी खवय्यांची चांगलीच गर्दी असते.

शिवाजी वडापाव

मिठीबाई कॉलेज जवळील शिवाजी वडापावदेखील लोकप्रिय आहे. अनेक लोकांना या वडापावची चव आवडते.

अशोक वडापाव

प्रभादेवीमधील किर्ती कॉलेज जवळील अशोक वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध वडापावपैकी एक आहे. गेल्या ३५ वर्षांपासून येथे हा वडापाव विकला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील या वडापावचा अस्वाद घेतला आहे.

VIEW ALL

Read Next Story