सकाळी की संध्याकाळी... वजन कमी करण्यासाठी कधी चालावं?

Pooja Pawar
Oct 10,2024


चालणं हे आरोग्यासाठी फादेशीर मानलं जातं. आपापल्या वेळेनुसार काहीजण सकाळी तर काहीजण संध्याकाळी चालायला जातात.


पण वजन कमी करण्यासाठी नेमकं कधी चालणं फायदेशीर ठरतं हे जाणून घेऊयात.


वजन कमी करण्यासाठी सकाळी 7 ते 9 या वेळेत चालणे फायद्याचे ठरते. सकाळी हालचाल केल्याने चयापचय वाढते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.


परंतू रात्री चालल्याने सुद्धा वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते. द हाऊस ऑफ वेलनेसच्या मते जर पचनाशी निगडित समस्यांचा सामना करत असाल तर संध्याकाळी किंवा रात्री चालल्याने पचनक्रिया सुधारे.


वजन कमी करण्यासाठी कॅलरीज बर्न करणे गरजेचे ठरते. तेव्हा संध्याकाळी चालल्याने खूप लवकर कॅलरीज बर्न होतात.


दररोज चालल्याने चयापचय क्रिया वाढते आणि चरबी सुद्धा लवकर कमी होते. शरीरातील अतिरिक्त चरबी घामाद्वारे बाहेर पडते.


संध्याकाळी चालण्याचा एक मोठा फायदा म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.


संध्याकाळी चालणे हा दिवसभरातील तणाव आणि चिंता कमी करण्याचा आणि शरीराला आराम देण्याचा उत्तम मार्ग आहे.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story