ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर काही गोष्टी पाहणं अशुभ मानलं जात. असे म्हणतात झोपेतून उठल्यावर काही गोष्टी पाहणे हे माणसाच्या विनाशाचे लक्षण आहे.
जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या नजरेसदेखील या गोष्टी येत असतील तर सावध व्हा. याकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर जर तुम्हाला घराच्या भिंतीवर किंवा कोपऱ्यात जाळे दिसले तर यामुळे आर्थिक परिस्थिती उद्भवू शकते.
सकाळी उठताच तुमची नजर रिकाम्या तिजोरीवर पडली तर ते अत्यंत अशुभ मानलं जातं.
घरातील काच वारंवार तुटणे अशुभ मानलं जातं. असे सतत घडत असल्यास काहीतरी संकट येण्याची शक्यता असते.
सकाळी उठल्यावर स्वत:ची सावली किंवा इतरांची सावली पाहू नये, ज्योतिष शास्त्रामध्ये सावली पाहणे अशुभ ठरते. यामुळे माणसाचा नाश होतो असे म्हटले जाते.
सकाळी उठल्यावर विझलेला दिवा दिसला तर ते खूप अशुभ लक्षण आहे. यावरून देवीदेवता क्रोधित असल्याचे सूचित होते.
जर अशी अशुभ चिन्हं तुम्हालासुद्धा दिसत असतील तर 'सर्वदुखरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते' या मंत्राचा जप दिवसातून 3 वेळा करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)