आपल्याकडे सीझननुसार कपड्यांची खरेदी-विक्री होत असते.उन्हाळ्यात सुती कपडे तर थंडीमध्ये ऊबदार कपडे वापरले जातात.
पण तुम्हाला माहित आहे का पावसाळ्यातही कपड्यांची योग्य निवड करणे गरजेचे असते.पावसाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत हे जाणून घ्या.
पावसळ्यात नायलॉनचे कपडे वापरणे फायदेशीर ठरते. नायलॉन जास्त वेळ पाणी टिकू देत नाही.
पावसाळ्यात शक्यतो घट्ट कपड्यांचा वापर टाळावा. पावसाळ्यात कपडे ओले होतात आणि मग ते पारदर्शी दिसू लागतात. आणि ओल्या कपड्यांमुळे चिडचिड होऊ शकते किंवा अस्वस्थ वाटू शकते.या व्यतिरिक्त सैलसर कपडे वापरा ते अंगाला चिकटून राहत नाहीत.
पावसाळ्यात गडद रंगाचे कपडे वापरणे गरजेचे असते. असे रंग आनंददायी वातावरण निर्माण करतात.
जार्जेट किंवा शिफॉनचे कपडे दिसायला जरी सुंदर वाटत असले किंवा लवकर वाळत असले तरी कपडे भिजल्यावर ते फार पारदर्शी दिसतात ज्यामुळे लाजिरवाणे वाटू शकते.
पावसाळ्यात बहुतेकदा डाग लागण्याची शक्यता असते त्यामुळे पांढरे कपडे घालणे टाळावेत.