उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात की आंबा व कैरीचे
उन्हाळ्यात कैरीचे लोणचे, कैरीचे पन्हे हे पदार्थ तुम्ही खाल्ले असतीलच
पण यंदाच्या उन्हाळ्यात कैरीची चटकदार व चटपटीत कौशिंबीर बनवून पाहा
कैरी, गाजर, कांदा, टॉमेटो, काकडी, हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, लाल मिरची पावडर, लिंबाचा रस, मीठ, कोथिंबीर
सर्वप्रथम वरीच सर्व साहित्य उभे चिरुन घ्या. कैरीची पण कोय काढून उभ्या चिरून घ्या
एका भांड्यात चिरुन झालेल्या भाज्या व कैरी घ्या. त्यानंतर त्यात मिरची बारीक चिरुन, शेंगदाण्याचा कूट, मिरची पावडर, लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाका
वरील हे सर्व मिश्रण व्यवस्थीत एकत्र करुन घ्या. त्यानंतर त्यात थोडा लिंबाचा रस टाका आणि पुन्हा एकत्र करुन घ्या
खिचडी किंवा वरण-भातासोबत तुम्ही कैरीची कोशिंबीर खाऊ शकता