कोकणची काळी मैना म्हणून करवंद खूप लोकप्रिय आहेत. आबंट गोड करवंद खाण्यासही खूप चविष्ट लागतात
या उन्हाळ्यात कच्च्या करवंदाचे लोणचे बनवा. याची सोप्पी रेसिपी जाणून घ्या
एक किलो करवंद, मोहरीची डाळ, साखर, मीठ, बडिशोपेची पूड, लोणचे मसाला, तेल आणि लसूण
सगळ्यात पहिले कच्चे करवंद ठेचून घ्या. नंतर त्याचे हाताने तुकडे करुन घ्या
आता त्यात मीठ, साखर, घालून दोन ते तीन दिवस ठेवा. छान पाणी सुटेल.
आता एका कढाईत तेल गरम करा. त्यात लसणाच्या पाकळ्या टाकून लाल होऊ द्यात.
गॅस बंद करुन त्याच तेलाच मोहरीची डाळ भाजून घ्या. आता त्यात लोणचे मसाला आणि घाला.
हे मिश्रण गार झाल्यानंतर ते करवंदात ओता आणि चांगले एकजीव करुन पाहा
आता हवाबंद बाटलीत करवंदाचे लोणचे भरुन ठेवा. जेणेकरुन ते वर्षभर टिकेल