धूळ आणि वाढत्या वयानुसार केसांशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. यामुळे बहुतेक लोकांना पांढऱ्या केसांचा त्रास होतो.
लोक केस काळे करण्यासाठी हेअर डाईचा वापर करतात. पण काही काळानंतर केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात.
शिवाय काही वेळाने केस पुन्हा पांढरे दिसू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही या पेस्टचा वापर करून तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे करू शकता.
हे तयार करण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात काळी होईपर्यंत शिजवा.
आता हे मिश्रण थंड करा आणि शॅम्पू करण्यापूर्वी एक रात्र केसांना लावून ठेवा. नंतर सामान्य पाण्याने केस धुवा.
हे तेल महिनाभर वापरल्यास केस पांढरे होण्याची समस्या कमी होऊ शकते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)