मखाना आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे मखान्याचा आपल्या आहारातील समावेश नक्कीच महत्त्वाचा आहे.
या रेसिपीचा वापर करून तुम्ही मखाना रायता अगदी सोप्या पद्धतीनं बनवू शकता.
मखाना रायता बनवण्यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात काही मखाने घाला.
त्याला नीट एकत्र केल्यानंतर, त्यात तुम्हाला हिरवी मिरची, तिखट, कोथिंबीर, चाट मसाला आणि पुदीना घालून हे मिश्रण ढवळून घ्या
यानंतर तुम्ही या रायत्याचा आस्वाद घेऊ शकतात. हा रायता तयार करायला तुम्हाला 5 मिनिटेही नाही लागणार.
तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यात डाळिंबाचे दाणे आणि अजुनही काही गोष्टी घालू शकता. ज्यामुळे त्याचा स्वाद वाढेल.
मखाना रायता खाल्याने तुम्हाला आरोग्यासाठी अनेक फायदे होतील, त्यामुळे तुम्ही याचा समावेश रोजच्या आहारात करू शकतात.
मखाना रायता खाल्याने हृद्य आणि अपचना संबंधी समस्या कमी होतात.
मखाना रायत्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते, ज्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो.