कितीही झोपलो तरी सारखी झोप येते? मग सावध व्हा

याचा अर्थ तुमच्या शरीरात काही गोष्टींची कमतरता आहे.

पुरेशी झोप घेतल्यानंतर तुम्हाला दिवसभर झोप येते, थकवा जाणवतो, अशक्तपणा वाटतो आणि शरीर दुखत का?

अनेक अभ्यासातून असं सिद्ध झालंय की, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळेही जास्त झोप आणि थकवा येतो.

व्हिटॅमिन डी तुमच्या शरीराला कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषण्यास मदत करतं.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे चयापचय मंदावते आणि रोग प्रतिकारशक्ती हळूहळू कमकुवत होते.

एवढंच नाही तर मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते.

व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन काढण्यासाठी सोयाबीन, दही, दूध आणि चीज यांचा आहारात समावेश करावा. सकाळचा सूर्यप्रकाश ग्रहण करावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story