वरण-डाळ खावून कंटाळा आलाय, या पद्धतीने करुन पाहा चिंच-गुळाची 'आमटी'

रोज वरण किंवा डाळ खावून कंटाळा आलाय का तर, आज ही चिंच-गुळाची आमची बनवून पाहा

साहित्य

तूप, राई, जिरे, हिंग, कडिपत्ता, हिरवी मिरची, तूर डाळ, हळद, गोडा मसाला, लाल तिखट, गुळ, चिंच किंवा कोकम, चवीपुरते मीठ, कोथिंबीर

कृती

सगळ्यात पहिले तुर डाळ कुकरला शिजवून घ्या. कुकर थंड झाल्यावर डाळ रवीने फेटून घ्या किंवा बारीक करुन घ्या

एका कढाईत तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्याला जिरे-मोहरी, कडिपत्ता, हिरवी मिरचीची फोडणी द्या. फोडणी तडतडल्यानंतर त्यात चिमूटभर हळद टाका.

त्यानंतर कढाईत शिजवलेली डाळ टाका. डाळीला थोडी उकळी आल्यानंतर त्यात 1 टेबलस्पून गोडा मसाला, मिरची पावडर, थोडासा गुळ आणि चिंचेचा कोळ आणि चवीपुरते मीठ टाका

आता हे सर्व साहित्य एकजीव करुन घ्या. आता यात एक गरजेनुसार पाणी टाका. आणि पाच मिनिटांपर्यंत आमटीला चांगली उकळी येऊ द्या

आता ही चिंच-गुळाची आमटी भातासोबत खा.

VIEW ALL

Read Next Story