आईस्क्रीम खायला सर्वांनाच खूप आवडते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्हीही ऋतूत आईस्क्रीम खाणाऱ्यांची संख्या अजिबात कमी होत नाही.

बाजारात विविध प्रकारचे आईस्क्रीम उपलब्ध आहेत. गुणवत्तेनुसार त्यांची किंमतही बदलते. काही आईस्क्रीम 5, 10 रुपयांना येतात, तर काही 500 किंवा 1000 रुपयांपर्यंत असतात.

प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे आवडीचे आईस्क्रीम खरेदी करतो आणि खातो. पण जगात एक असे आईस्क्रीम आहे, जे विकत घेण्यापूर्वी आणि खाण्यापूर्वी तुम्हीही शंभर वेळा विचार कराल.

जर तुम्हाला सर्वात महागड्या आईस्क्रीमच्या किमतीबद्दल विचार करण्यास सांगितले तर तुम्ही 1 हजार, 2 हजार किंवा जास्तीत जास्त 10, 20 हजारापर्यंतच विचार करू शकाल.

पण, जगातील सर्वात महागड्या आईस्क्रीमची किंमत तुमच्या विचारापेक्षा जास्त आहे.

जपानची आईस्क्रीम बनवणारी कंपनी सिलाटोची ब्याकुया (Byakuya) नावाची जगातील सर्वात महागडं आईस्क्रीम बनवते.

या आईस्क्रीमचा बेस दुधापासून बनवला जातो. त्यात दोन प्रकारचे चीज आणि अंड्यातील पिवळा बलक देखील असते.

याशिवाय परमिगियानो चीज, व्हाईट ट्रफल ऑइल अशा अनेक गोष्टींचाही हे आईस्क्रीम बनवताना समावेश असतो.

याशिवाय परमिगियानो चीज, व्हाईट ट्रफल ऑइल अशा अनेक गोष्टींचाही हे आईस्क्रीम बनवताना समावेश असतो.

हे आईस्क्रीम स्टायलिश ब्लॅक बॉक्समध्ये पॅक केले जाते. विशेष म्हणजे हाताने बनवलेला धातूचा चमचाही यासोबत येतो.

जपानच्या या आईस्क्रीमची किंमत 873,400 जपानी येन म्हणजेच सुमारे 5.2 लाख रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story