अनेकदा रात्री आपल्या घरता उरलेली भाकरी आपण फेकून देतो. शिळी चपाती खाल्ल्याने तुमच्या शरीरातील पचनशक्ती वाढते तर वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त मानली जाते.
शिळी चपाती आणि दूध अगदी चवीनं खाल्ल जातं पण तुम्हाला दूध भाकरी खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का?
रात्रीचा उरलेली चपाती ही गरम दुधासोबत नाही तर थंड दुधासोबत खाल्ली जाते.दूध चपाती खाताना चपातीचे तुकडे करून एका भांड्यात ठेवा.
त्यानंतर त्यामध्ये दूध घाला आणि 10 ते 20 मिनिटं तसंच ठेवून द्या आणि मग तुम्ही ते खाऊ शकता.
शिळी चपाती आणि दूधामुळे प्रथिने आणि कारब्रोहायड्रेट्स वाढतात ज्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते.
शिळ्या चपातीमध्ये प्रोबायोटिक्स आतड्यांचे मायक्रोबायोम संतुलित ठेवण्यास मदत करतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते.
दुधातील जीवनसत्वे आणि खनिजे तर शिळ्या भाकरीमधील अँटीऑक्सीडंट्स निरोगी त्वचा आणि केसांना प्रोत्साहन देतात. याचं सेवन केल्याने केसांचे आणि त्वचेचं आरोग्य व्यवस्थित राहते