श्रावण आला की पारंपारिक पदार्थ मोठ्या प्रमाणात केले जातात
गौरी-गणपतीचे आगमनाची तयारीदेखील केली जाते.
गौराईच्या नैवेद्यासाठी लागणारा एक पदार्थ म्हणजे घावण घाटले
घावण घाटले कसं बनवायचे याची रेसिपी जाणून घ्या
तांदळाचे पीठ, मीठ, पाणी तेल, नारळाचे दूध, खसखस, वेलची पूड, साखर, तांदळाची पिठी
सगळ्यात आधी घाटलं बनवण्यासाठी नारळाच्या दुधात पाव वाटी तांदळाची पिठी टाकून चांगलं मिक्स करा
नंतर, त्यात खसखस, वेलची पूड, दोन वाट्या पाणी आणि साखर घालून एक उकळी काढा. तुमचं घाटलं तयार
घावण करण्यासाठी तांदळाच्या पिठात पाणी आणि चवी पुरतं मीठ टाकून एकजीव करुन घ्या
त्यानंतर तवा चांगला तापल्यावर त्यावर घावणाचं पीठ सोडा. आणि दोन मिनिटं झाकण ठेवा
छान जाळीदार घावण तयार झाल्यावर एका वाटीत घाटलं वाढून ते घावणासोबत खायला द्या