सकाळी केलेल्या चपात्या दुपारच्या जेवणातच कडक होतात.
कडक झालेल्या चपात्या खायला लहान मुलांसह मोठी माणसंही नखरे करतात
त्यामुळं चपात्या दीर्घकाळापर्यंत नरम ठेवण्यासाठी या टिप्स वापरुन पाहा
चपात्यांसाठी पीठ मळताना त्यात थोडेसे तेल आणि मलाई टाका. यामुळं चपाती आणि पराठे नरम राहतात.
चपात्या किंवा पराठ्यांसाठी पीठ मळत असताना त्यात थोडे कोमट पाणी टाकावे, यामुळं चपात्या नरम राहतात.
पीठ मळत असताना त्यात थोडे दूध टाका त्यामुळं चपात्या छान फुलतात
चपात्या कॅसरोलमध्ये ठेवण्याच्या आधी खाली एक सूती कपडा टाकून चपात्या ठेवा. त्यामुळं त्या दीर्घकाळापर्यंत नरम राहतात.
चपात्या भाजत असताना त्याच्या मधोमध थोडेसे तूप टाका. यामुळंही चपात्या सॉफ्ट राहतात.