जबरदस्त! 180 पेलोड, 166 किमी रेंज; इलेक्ट्रीक स्कूटरचा 'हनुमान' पाहिला?
देशातील प्रमुख दुचाकी कंपनी मोटोवोल्ट मोबिलिटीनं Motovolt M7 ही स्कूटर लाँच केली आहे. या मल्टीयुटीलिटी स्कूटरची किंमत 1,22,000 रुपये आहे.
अवघ्या 999 रुपयांमध्ये तुम्ही ही स्कूटर बुक करू शकता. कन्फर्ट आणि सुरक्षिततेची हमी देणारी ही स्कूटर जर्मन तंत्रानं साकारण्यात आली आहे. एक लोडर म्हणूनही ही स्कूटर तुम्ही वापरू शकता.
ही स्कूटर खासगी वाहनासोबतच एक कमर्शिअल अर्थात व्यावसायिक वाहनही होते. या स्कूटरची आसनव्यवस्था M7 एर्गोनॉमिक पद्धतीनं डिझाईन करण्यात आली आहे.
स्कूटरची पेलोड क्षमता 180 किलो इतकी आहे. मोटोवोल्ट एम7 साठी 3kWh च्या अॅडव्हांस एलएफपी सेल बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ही बॅटरी पोर्टेबल असून, सहजगत्या चार्ज होणारी आहे.
सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 166 किमी इतकं अंतर चालू शकते. सिंगल बॅटरीमध्ये येणारी ही स्कूटर अपग्रेड करून ड्युअल बॅटरी करता येते. या स्कूटरला टेलीमॅटिक्स प्रणालीशी जोडण्यात आलं आहे.
मोबाईल अॅपशी कनेक्ट होणाऱ्या या स्कूटरला तुम्ही लाईव्ह ट्रॅक करू शकता. 6 रंगांमध्ये ही स्कूटर उपलब्ध आहे. ज्यामध्ये गॅलेक्सी रेड, ब्लू जे, डव व्हाईट, कॅनरी यल्लो, पुमा ब्लॅकचा समावेश आहे.
सध्याचा ट्रेंड आणि काळाची गरज ओळखून तयार करण्यात आलेली ही स्कूटर तुम्ही कधी खरेदी करताय?