चहासाठी असो किंवा भाजीत फोडणी घालण्यासाठी असो घराघरांत दररोज आल्याचा वापर होतो
अनेकजण बाजारातून एकदाच आलं घेऊन येतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात किंवा काही जण फ्रीजबाहेर ठेवतात
पण आलं फ्रीजमध्ये ठेवावं की बाहेर? कोणती पद्धत योग्य जाणून घेऊया
आलं तुम्ही दोन्ही ठिकाणी स्टोअर करु शकता. पण आलं तुम्हाला 2-3 आठवड्यांसाठी वापरायचं असेल तर तुम्ही आलं बाहेर ठेवू शकतात
पण सूर्यप्रकाश जास्त असेल अशा भागात आलं ठेवू नका नाहीतर सुकून जाईल
आलं फ्रीजमध्ये ठेवताना एखाद्या कपड्यात बांधून किंवा जाळीत ठेवाने. जेणेकरुन ते सुकणार नाही