कथावाचक आणि प्रेरणादायी वक्ता जया किशोरींना कोणत्या ओळखीची गरज नाही.
भारतच नव्हे तर जगभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरु असते.
सोशल मीडियावरही जया किशोरी यांचे फॅन फॉलोइंग तगडे आहे.
जया किशोरी आपल्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना असं काही मार्गदर्शन करतात, ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदलून जातं.
काही दिवसांपूर्वी जया किशोरी यांनी राजस्थानच्या कोटा येथील कोचिंग सेंटरला भेट दिली.
येथे त्यांनी आयुष्यात तेजस्वी कसं व्हायचं? याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
तुमच्यात कोणता वाईट गुण असेल आणि तो तुम्ही ठिक करत नसाल तर यापेक्षा वाईट काहीच नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जर तुमच्यातील उणिव तुम्ही भरुन काढली नाही तर तुम्ही तेजस्वी होणार नाही, असे त्या सांगतात.
आपल्यातील उणिवा कमी करा, त्यावर काम करा, तुम्हाला यश नक्की मिळेल असे त्यांनी सांगितले.