मासिक पाळीत महिलांना अनेकदा वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. महिलांना अधिकतरुन चॉकलेट खायला जास्त आवडते.
मासिकपाळीत चॉकलेटचे सेवन करणाऱ्या महिलांचा दावा आहे की, यामुळं वेदना कमी होतात आणि आराम मिळतो.
मात्र, मासिक पाळीत डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला दिल्ला जातो. यामागचे कारण जाणून घेऊया.
डार्क चॉकलेटमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि सेरोटोनिन (अँटीडिप्रेंट) पिरियड क्रॅम्प्स कमी करण्यास मदत करतात.
पीरियड्समध्ये तुमचा मूड सतत बदलत असेल तर तुम्हाला डार्क चॉकलेट खाण्याचा सल्ला दिला जातो.
डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळं ताण-तणावही कमी होतो.
चॉकलेटमध्ये कॅल्शियम, पॉटेशियम, ओमेगा-३ आणि 6 फिनोल, आयर्न, मॅग्नीशियम आणि फ्लेवोनोइड्स सारखे फायदेशीर तत्वे आढळले जातात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पीरियड्समध्ये प्रमाणात चॉकलेट खाण्यास काहीच वाइट नाहीये.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)