गीझर वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा तुमच्या जीवावरही बेतू शकते.

Dec 24,2023

गीझरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. अन्यथा छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते.

गीझर चालू केल्यावर पॉवर इंडिकेटर दिसतोय का याची खात्री करुन घ्यावी.

पॉवर इंडिकेटर चालू नसल्यास, तो का चालू नाहीये याचा शोध घ्यावा

बऱ्याच वेळ वापरल्यानंतरही इंडिकेटर ऑन होत नसेल तर याचा अर्थ हिटींग सिस्टम योग्य पध्दतीने काम करत नाही.

गीझरमधून आवाज येत असेल तर त्यात बिघाड झाल्याची शक्यता असते. अशा वेळी गीझर वापरणे धोकादायक ठरु शकते.

अनेकदा गीझरमधल्या काही भागातून लीक होत असतं, त्यामुळं वर्षातून दोनदा या गोष्टी नेहमी तपासल्या पाहीजेत.

गीझरचा वापर झाल्यानंतर तो लगेच बंद करा.

VIEW ALL

Read Next Story