चहा प्यायली नाही तर अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. भारतात सर्वाधिक लोक चहाचे सेवन करतात.
काहीजण चहा बनवताना चुकीची पद्धत वापरतात ज्यामुळे चहाची चव बिघडते आणि अनेकदा त्याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
तेव्हा चहा बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत कोणती हे जाणून घ्या.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार आयुर्वेदिक पद्धतीने चहा करताना गॅस चालू करून त्यावर भांड ठेवा त्यात आधी दूध टाका, मग साखर त्यानंतर आले, वेलची पावडर आणि मग चहापत्ती टाकून भांड्यावर एक प्लेट ठेऊन गॅस बंद करा.
या पद्धतीमुळे चहा चांगली बनते आणि खूप वेळ उकळवावी लागत नाही.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार दिवसातून केवळ दोन वेळाच चहाचे सेवन करावे. अन्यथा ऍसिडिटी, गॅस या सारखी समस्या होऊ शकते.
जास्त चहा प्यायल्याने दात कमकुवत होतात आणि पचनक्रियेच्या समस्या उद्भवू शकतात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)