मासे खाल्ल्यास काय होतं?

Sep 30,2024


मासे खाणे हे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातं. कारण त्यात भरपूर प्रमाणात पोषक असतं.


फिशमध्ये प्रथिने, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन डी, बी 12 आणि अनेक खनिजे असतात.


ओमेगा-3 फॅटी अॅसिड असलेले माशांचं सेवन केल्यामुळे हृदयाच्या धमन्यांमध्ये जमा झाले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरतं.


ओमेगा-3 फॅटी अॅसिड हे मेंदूच्या विकास आणि त्याचं कार्य सुधारण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते आणि स्मृतिभ्रंश सारख्या आजारांचा धोका कमी होतो.


माशांमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. जे सांधेदुखी आणि संधिवात यासारख्या समस्यांवर फायदेशीर ठरते.


माशांमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळतं. जे हाडे मजबूत करण्यात मदत करतं.


ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि प्रथिने हे त्वचा आणि केसांच्या पोषणासाठी फायदेशीर आहे.


माशांमध्ये आढळणारे पोषक तत्त्व डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर आहे.


माशांचे सेवन मानसिक आरोग्यासाठी खूप जास्त चांगलं असतं. नैराश्य आणि चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.


गरोदरपणात मासे खाणे आई आणि बाळासाठी फायदेशीर मानलं जातं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story