नाचणी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोजच्या आहारात त्याचा समावेश करावा.
नाचणीची भाकरी तर खावून कंटाळा आला असेल तर आज जाणून घ्या नाचणीचे लाडू कसे बनवायचे.
दीड वाटी नाचणीचे पीठ, साजूक तूप, एक वाटी पिठी साखर, वेलची पूड, दूध, काजू-बदाम बारीक काप
सर्व प्रथम कढाईत तूप घेऊन गरम करुन घ्यावे. त्यानंतर त्यात नाचणीचे पीठ टाकून चांगले भाजून घ्यावे
लक्षात घ्या की पीठ भाजत असताना सतत हलवत राहावे. खरपूस भाजल्याचे जाणवताच त्यात दूध घाला आणि हे मिश्रण एकजीव करा.
आता गॅस बंद करुन यामध्ये पीठिसाखर घालून पुन्हा सगळे मिश्रण एकजीव करा.
मिश्रण चांगले एकजीव झाल्यावर त्यात वेलची पावडर व काजू बदाम घालू शकता
हे मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्या. हे लाडू पौष्टिक व बहुगुणी असतात.