घरच्या घरी कसं बनवायचं Aloevera Gel? पाहा सोपी पद्धत

Aug 17,2024

केसांचं आरोग्य

केसांच्या आरोग्यापासून त्वचेच्या आरोग्यापर्यंत अनेक ठिकाणी कोरफडीचे फायदे दिसून येतात. घरच्या घरी उगवता येणाऱ्या या कोरफडीचं जेल कसं बनवतात माहितीये?

कोरफडीचं जेल

कोरफडीचं जेल तयार करण्यासाठी एक चांगली आणि मोठी कोरफडीची पात घ्या. मोठ्या पातीमध्ये गर जास्त मिळतो.

कोरफडीची पात

कोरफडीची पात काही वेळासाठी पाण्यात ठेवा आणि त्यातून निघणारा पिवळसर स्त्राव काढून टाका.

पातीतील गर

आता पातीतील गर अलगदपणे एका वाटीमध्ये काढून घ्या. जेल तयार करण्यासाठी अशा तीन ते चार पातींचा वापर करा.

एकजीव करून घ्या

कोरफडीच्या पात्यातून काढलेला गर आता मिक्सरच्या भांड्यात टाकून तो चिकट होईपर्यंत एकजीव करून घ्या.

फ्रिजमध्ये ठेवा

मिक्सरच्या डब्यात फिरवून झाल्यानंतर काही वेळ हे जेल असंच ठेवा आणि त्यानंतर जेल एका स्वच्छ डबीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.

जेल अधिक काठळ टिकवण्यासाठी...

आठवड्याभरासाठी हे जेल तुम्ही वापरु शकता. या जेलला अधिक काळ टीकवण्यासाठी तुम्ही यामध्ये व्हिटामिन सी किंवा ई मिसळू शकता.

VIEW ALL

Read Next Story