भेसळयुक्य लाल मिर्ची खाताय का कसं ओळखला?
सगळ्यात आधी एका ग्लास पाण्यात एक चमचा मिर्ची घाला आणि ती व्यवस्थित मिक्स करा.
लाल मिर्ची पावडर पाण्यात चांगली मिक्स झाल्यानंतर ती हातावर चोळून घ्या.
हातावर चोळल्यानंतर तुम्हाला ती खरखरीत जाणवत असेल तर समजावे की त्यात विटांची पावडर मिसळली आहे.
पाण्यात मिसळल्यावर पाण्यात लाल रेषा दिसत असेल तर त्यात रंग भेसळ आहे असे समजावे.
हातात चोळताना तुम्हाला साबणाप्रमाणे गुळगुळीत वाटत असेल तर समजून घ्या की त्यात साबण मिसळला आहे. अशा पद्धतींमुळे खरी आणि बनावट लाल तिखट यातील फरक ओळखता येतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)