हिवाळ्यातही मिनिटांमध्ये सुकतील ओले कपडे; फक्त करा या '3' गोष्टी

हिवाळ्यात ओले कपडे न सुकणं ही सर्वात मोठी डोकेदुखी असते. जर ऊन पडलंच नाही तर कपडे ओलेच राहतात.

त्यामुळेच हिवाळ्यात लोक कपडे जितके शक्य होतील तितक्या कमी वेळा धुण्यास टाकतात.

पण हिवाळ्यात ऊनाशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या आधारे तुम्ही कपडे सुकवू शकता.

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हिटरच्या सहाय्याने कपडे सुकवू शकतो.

हिटरने कपडे सुकवण्यासाठी बेडच्या चादरवर ओले कपडे पसरवा आणि त्यावर एक चादर टाका. यानंतर समोरील टेबलवर हिटर लावा.

हिवाळ्यात तुम्ही टॉवेलच्या सहाय्यानेही कपडे सुकवू शकता.

टॉवेल पसरवून त्यावर ओले कपडे ठेवा आणि नंतर त्यावर दुसरा टॉवेल ठेवून जोर द्या. यानंतर कपडे अजून सुकवण्यासाठी रशीवर टाका.

याशिवाय तुम्ही हेअर ड्रायरचाही वापर करु शकता.

हेअर ड्रायरच्या सहाय्याने तुम्ही काही मिनिटात कपडे सुकवू शकता.

VIEW ALL

Read Next Story