तांब्याची भांड्यामध्ये जेवण केल्यानं आणि पाणी प्यायल्यानं शरीराला खूप फायदे होतात. पण त्यांचा वापर खूप कमी घरात करण्यात येतो.
जास्त काळ बाहेर ठेवली किंवा सतत वापरली तर तांब्याची भांडी काळी होतात आणि डाग निघता निघत नाहीत. ते साफ करण्याच्या काही टिप्स जाणून घेऊया.
तांब्याची भांडी नवी दिसायला हवी असं तुम्हाला वाटत असेल तर चिंचेच्या पाण्याचा वापर करु शकता.
विनेगर आणि मीठ एकत्र करुन त्यानं तांब्याची भांडी धुतल्यास नवी दिसू लागतील.
लिंबूवर थोडं मीठ घालून त्यानं जर तांब्याची भांडी धुतली तर लगेच चमकू लागतात. पण त्याला चांगल्या पद्धतीनं घासायला हवी.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)