दिवाळीत भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Oct 19,2024

सणांच्या दिवसांमध्ये पनीरची मागणी मोठ्या प्रमाणात होते.

अशावेळी बाजारात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर मिळते.

रंग

शुद्ध पनीरचा रंग पांढरा किंवा ऑफ व्हाईट रंगाचा असतो.

पिवळा रंग किंवा चमकदार रंगाच पनीर असेल तर ते भेसळयुक्त पनीर असे समजा.

शुद्ध पनीर हे थोडे दाणेदार किंवा सॉफ्ट असते. ते सहज तुटत नाही.

भेसळयुक्त पनीर हे चिकट, कठोर आणि तुटता तुटत नाही.

गंध

शुद्ध पनीरमध्ये दूधाचा हलका गंध येतो. जर पनीरला विचित्र गंध आला तर ते भेसळयुक्त पनीर आहे असे ओळखा.

स्वाद

पनीर खरेदी करताना छोटा तुकडा खाऊन घ्या. जर तो दुधासमान लागला तर ते शुद्ध पनीर आहे.

जर पनीर तोंडात फिरत असेल चावला जात नसेल ते भेसळयुक्त पनीर समजा.

VIEW ALL

Read Next Story