तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर इतरांवर निस्वार्थी प्रेम करायला शिका. स्वार्थी पणा सोडून इतरांवर मनापासून प्रेम करा.
तुम्ही इतरांच्या चुका स्वीकारा. कारण एखाद्या व्यक्तीवर आपले मत मांडणे, त्यांच्या चुकांवर भाष्य करणे.
प्रत्येक गोष्टीवर निर्णय देणे आवश्यक नाही. तसेच इतरांच्या चुका स्वीकारणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्ही त्यांच्या चुकांसह त्यांना स्वीकारले पाहिजे.
तुम्ही जसे आहात तसे राहा. लोकांसमोर खोटी प्रतिमा दाखवू नका. जसे आहात तसे राहा. चांगले असल्याचा आव आणण्यापेक्षा तुम्ही चांगले वागण्याचा प्रयत्न करा.
इतरांबद्दल विचार करू नका. समोरची व्यक्ती काय करते. तिची किती प्रगती झाली आहे. याविषयी जाणून घेण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.
आनंदी जीवन जगण्यासाठी इतरांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही इतरांना आनंद द्या. कारण तुम्ही इतरांना त्रास दिला तर तुम्हालाही त्रास होईल.