अधिक काळ फोन पकडल्यामुळे जेव्हा तुमची बोटं दुखू लागतात, तेव्हा त्या कंडिशनला 'स्मार्टफोन फिंगर' असं म्हटलं जातं.
पूर्वीच्या काळी मोबाईलचा आकार लहान होता. तसंच कित्येक बटणांचे फोन वजनाने देखील हलके होते. मात्र आता मोठ्या आकारांचे आणि अधिक वजनाचे स्मार्टफोन आले आहेत.
तुमचा हात दुखतोय असं वाटत असेल, तर त्वरीत आपला मोबाईल खाली ठेवा. फोनचा वापर हळू-हळू कमी करण्याची सवय लावा.
एखाद्या कामासाठी फोन हातात घेतल्यास काम झाल्यानंतर लगेच खाली ठेवा. बोटांना किंवा मनगटाला दुखत असल्यास त्या ठिकाणी बर्फ लावावा.
बोटांना शेकणे हादेखील चांगला पर्याय ठरू शकतो.
जर त्रास वाढत जातोय असं वाटलं, तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा.