2200 ब्रिटीश प्रौढांच्या सहभागानं करण्यात आलेल्या एका संशोधनावरून टॉवेल नेमका किती वेळा धुवावा याची माहिती अनेकांनाच नाहीय.
44 टक्क्यांहून अधिक लोकांच्या मते त्यांनी 3 महिन्यांपर्यंत टॉवेल धुतले नाहीयेत. साधारण तीन महिन्यांनीच ते टॉवेल धुतात. तर, पाचापैकी एक व्यक्ती महिन्यातून एकदा टॉवेल धुते.
एक चतुर्थांश लोकांनुसार ते आठवड्यातून एकदा, तर वीसातून एक व्यक्ती दर दिवशी टॉवेल धुते.
लंडनच्या होम हायजीन अँड इंफेक्शन डिसीज प्रिवेंशन एक्सपर्ट डॉ. सॅली ब्लूमफील्ड यांच्या माहितीनुसार आठवड्यातून एकदा टॉवेल गरम पाणी आणि सॉफ्ट डिटर्जंटनं धुवावा.
टॉवेल जरी स्वच्छ दिसत असला तरीही त्यावर अनेक सूक्ष्मजीव असतात ज्यामुळं आरोग्यास धोका असतो. टॉवेलचा वापर शरीरातील त्या भागावर केला जातो जिथं सूर्यप्रकाश पोहोचत नसल्यामुळं बॅक्टेरियांचा वावर असतो.
एखादा त्वचेचा संसर्ग आणि तत्सम गोष्टींशी अडचणीत असाल, तर टॉवेल दर दिवशी धुणं फायद्याचं ठरतं.