धनत्रयोदशीच्या विशेष मुहूर्तावर घरी आणा 'या' 5 गोष्टी, होईल धनप्राप्ती
Oct 28,2024
प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सुरूवातीला कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो.
यावर्षी धनत्रयोदशी वसुबारसनंतर 29 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे.
या धनत्रयोदशीला 100 वर्षांनंतर त्रिग्रही योग तयार होत आहे. याशिवाय त्रिपुष्कर, वैधृत याग आणि उत्तर फाल्गुनी नक्षत्राचा संयोग जुळून येत आहे.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर धातूचे भांडे खरेदी केल्यास घरात सुख-शांती टिकून राहिल.
गणपती आणि लक्ष्मीच्या 2 वेगळ्या मुर्त्या घरी आणून दिवाळीत पूजा केल्यास तुमचं नशीब उजळेल.
धनत्रयोदशीला कुबेर यंत्र घरात आणा आणि त्याची पूजा करून घरातल्या मंदिरात त्या यंत्राची स्थापना करा.
धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू घरी आणणे शुभ मानले जाते.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर घरी धणे आणणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)