ना जास्त ना कमी, वयानुसार किती झोप घ्यावी?

नेहा चौधरी
Jan 19,2025


वयानुसार किती झोपावे, कारण कमी किंवा जास्त झोपणेदेखील आरोग्यासाठी हानिकारक असतं.


आरोग्य तज्ज्ञांनुसार 0-3 महिन्यांच्या बाळाला दररोज 17 तास झोपेची आवश्यकता असते.


12 महिन्यांच्या बाळांना 16 तास तर 2 वर्षांच्या मुलांसाठी 11 ते 14 तासांची झोप गरजेची असते.


अहवालानुसार 3 ते 5 वर्षांच्या मुलांना 10 ते 13 तास, 6-12 वर्ष मुलांना 9-12 तास आणि 13-17 वर्षांच्या मुलांना 8 - 10 तासांची झोप आवश्यक आहे.


सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनुसार 18-60 वयोगटातील लोकांना दररोज 7-8 तासांची झोप गरजेची आहे.


संशोधनानुसार 61-64 वर्ष वयोगटातील लोकांनी दररोज 7-9 तास झोपले पाहिजे.


65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी 7-8 तास झोपावे. यामुळे आरोग्य चांगले राहणार आहे.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story