सध्या अनेक जण कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करतात.
अवघ्या काही मिनिटांमध्ये मशीनमध्ये कपडे धुतले जातात.
कपडे धुताना वॉशिंगमशीनमध्ये किती डिटर्जंट पावडर टाकावी हे कदाचित अनेकांना माहित नसते.
कपडे खूप जास्त खराब असतील तर जास्त पावडर टाकायची आणि कमी खराब असेल तर कमी पावडर टाकायची असा काहीचा समज असतो.
कपडे धुताना योग्य प्रमाणात वॉशिंग पावडर वापरली नाही तर कपडे पूर्णपणे खराब होऊ शकतात.
कपडे धुताना मशीनमध्ये जास्त प्रमाणात डिटर्जंट पावडर टाकल्यास कपडे खराब होतात.
कपड्यांच्या वजनानुसार डिटर्जेंट पावडरचा वापर करावा.