बंगळुरूमधील एका कंपनीमध्ये AI इंजिनीयर म्हणून काम करणाऱ्या अतुल सुभाष मोदी यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं आणि देशभरात खळबळ माजली.
हे पाऊल उचलण्याआधी त्यांनी 1 तास 20 मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला. तसंच त्यांनी 24 पानांचं एक पत्रही लिहिलं.
अतिशय टोकाचा निर्णय घेणारे अतुल सुभाष हे पहिले पुरुष नसून, दरवर्षी जगभरात असे कैक पुरुष आहेत जे नाईलाजानं या निर्णयापर्यंत पोहोचतात ही शोकांतिका.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार जगभरात दरवर्षी 7 लाखांहून अधिक व्यक्ती स्वत:ला संपवतात.
जगभरात उचललं जाणारं हे पाऊल मृत्युचं तिसरं मोठं कारण ठरलं आहे.
एनसीआरबी (NCRB) च्या आकड्यांवरुन समोर आलं की या निर्णयामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या जास्त आहे.
भारतात स्वत:च्या आयुष्याचा शेवट करणाऱ्या पुरुषांची संख्या 66 हजारांवरुन थेट 1 लाखांच्या पार पोहोचली आहे.
दर दिवशी सरासरी 336 पुरुष या गंभीर निर्णयापर्यंत पोहोचून स्वत:ला संपवतात.