रोज किती कप कॉफी पिणे सुरक्षित? तज्ज्ञांनी केला खुलासा

कॉफी हे एक उत्तेजक घटक आहे, जे हृदयगती वाढवू शकते आणि परिणामी हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.

कॉफी प्यायल्याने नॉरड्रॅनालाईन आणि नॉरपेनेफ्राइन सोडण्यास चालना मिळते, ज्यामुळे काही व्यक्तींमध्ये हृदय गती आणि रक्तदाब वाढू शकतो.

खूप जास्त प्रमाणात प्यायलेली ब्लॅक कॉफी हृदयाच्या स्नायूंना उत्तेजित करू शकते आणि एरिथमिया म्हणजेच हृदयाचे अनियमित ठोके होण्यास कारणीभूत ठरू शकते.

भारतात बहुतेक दूध असलेली कॉफी प्यायली जाते, जी कॅफीनचा प्रभाव कमी करते. त्यामुळे दिवसातून दोनदा कॉफी घेणे कोणत्याही प्रकारच्या हृदयरोगासाठी सुरक्षित आहे.

कॉफी किती प्रमाणात प्यावी यासाठी मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे, कारण प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर होणारा कॅफिनचा प्रतिसाद भिन्न असतो.

कोणत्याही परिस्थितीत, तीन ते चार कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका. फक्त कॉफीच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे, हे हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे नाही.

VIEW ALL

Read Next Story