विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळून भारताच्या विजयात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले ज्यामध्ये भारताने 70 धावांनी विजय मिळवला आणि विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.
या सामन्यामधून विराट कोहलीने त्याच्या ओडीआय कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावले आणि सामन्यादरम्यान त्याची पत्नी अनुष्का शर्मा विराटच्या या कामगिरीवर खूप आनंदी झाली.
विराटने शतक झळकावताच अनुष्काचा चेहरा आनंदाने फुलला आणि आपल्या आनंदाला व्यक्त करत तिने विराटला स्टँडवरून अनेक फ्लाइंग किस्सही दिली.
विराटच्या कारकिर्दीतील आनंदात अनुष्का नेहमीच सहभागी असते, सुरवातीपासूनच अनुष्काने विराटला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात साथ दिली आहे.
प्रत्येक विवाहित जोडप्याने विराट आणि अनुष्काच्या लव्ह लाईफमधून नक्कीच काहीतरी शिकायला हवे. तर आज बघूया की वैवाहिक जीवनात पत्नीचा आधार किती महत्त्वाचा असतो ?
पतीला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत बनवणे आणि पत्नीचे प्रेम आणि साथ पतीला आयुष्यातील कठीण प्रसंगातही धीर देते.
पतीला यश मिळविण्यात मदत करते आणि पत्नीचा पाठिंबा पतीला त्याचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करतो.
पती-पत्नीमधील विश्वास आणि समजूतदारपणा वाढतो जेव्हा पत्नीच्या पाठिंब्यामुळे पतीला असे वाटते की ती नेहमीच त्याच्यासाठी आहे.
ज्या पुरुषांच्या बायका त्यांना साथ देतात ते एकटे असलेल्या लोकांपेक्षा अधिक यशस्वी होतात. याव्यतिरिक्त, ते अधिक उत्पादक असतात, अधिक पैसे कमावतात आणि अधिक आनंदी राहतात.