सध्याच्या प्रदूषणामुळे पर्यावरणामध्ये होणारे बदल आपल्या आरोग्यसाठी हानिकारक आहे आणि त्याने आपल्याला अनेक आजार किंवा त्रास होऊ शकतात .

जसं की वायू प्रदूषणामुळे घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास या समस्या उद्भवू शकतात.

तर यासाठी आपण आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता.

हिरव्या पालेभाज्या:

या भाज्यांमध्ये आयर्न आणि कॅल्शियम असल्यामुळे रक्तवाढीला आणि हाडांना बळकट व्हायला उपयुक्त मदत मिळते .

फळं

तुम्ही संत्री, लिंबू आणि द्राक्ष यांसारखी फळं खाऊ शकता ज्याने तुमच्या शरीरात सिट्रिक अ‍ॅसिड आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण वाढते.

ब्रोकोली:

ब्रोकोली, फ्लॉवर आणि कोबी सारख्या क्रूसीफेरस भाज्यांचा समावेश केल्यास वाढत्या वायू प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळण्यास मदत होते.

आवळा:

आवळामध्ये व्हिटॅमिन सी आहे आणि आवळ्याचा आहारात अनेक प्रकारे समावेश केला जाऊ शकतो.

हळद:

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग भरपूर प्रमाणात असते, जे वायू प्रदूषणाशी लढण्यासाठी आवश्यक असते.

लसूण आणि कांदे:

यामध्ये व्हिटॅमिन ए, बी ६, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते जे तुमच्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत करते.

ग्रीन टी:

तुम्ही रोज सकाळी ग्रीन टी प्यायल्याने तुमची इम्युनिटी सुधारू शकता.

VIEW ALL

Read Next Story