अनेक जण नवरात्रीत उपवास करतात. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. असं होऊ नये यासाठी तुम्ही हेल्दी ड्रिंक्स पिऊ शकता.
उपवासाच्या दिवसात तुम्ही नारळ पाणी किंवा त्यात मलई मिक्स करून त्याचे सेवन करू शकता. यामुळे तुम्ही दिवसभर हायड्रेट राहू शकता.
तुमच्या आवडीच्या कोणत्याही फळांचं ज्यूस मिक्स करून ज्यूस बनवा. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
नवरात्रात तुम्ही आवळा, बीट आणि गाजराचे यांचे एकत्रित ज्यूस करून पिऊ शकता.
दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी तुम्ही ड्राय फ्रुट्स शेक पिऊ शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)