आजकाल शक्यतो सगळेच जण जेवण्यासाठी काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर करतात.
आता बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारची भांडी मिळतात.
ही भांडी नॉन स्टिक आणि लवकर न तुटणारी असल्याने कित्येकजण त्या भांड्याचा रोजच्या वापरात समावेश करतात.
पण तुम्हाला माहित आहे का? ही भांडी आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
सहसा स्टील किंवा काचेच्या भांड्यांमध्ये जेवणे योग्य आहे. पण काही असे धातू आहेत ज्यांमध्ये जेवण्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत.
आयुर्वेदानुसारसुद्धा या धातुच्या भांड्यात जेवणे शरीरासाठी गुणकारी असल्याचे अनेक संशोधनात समोर आले आहे.
हे धातू 'तांबं' आहे. तांब्याच्या भांड्यात नियमित जेवल्याने रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
तांब्यात असलेल्या अँटी-इन्फ्लेमेटरी गुणामुळे शरीरातील दुखणे, सुजणे यांसारख्या समस्या दूर करता येतात.
तांब्याच्या भांड्यात जेवल्याने 'संधिवाता'चा (आर्थराइटिस) त्रास कमी करता येतो.
एवढेच नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात आणि कोणत्याही जखमा लवकर भरून काढण्यात तांब्याची भांडी मदतरुप ठरतात.
त्वचेसंबंधी समस्यादेखील या बहुगुणी धातुच्या भांड्यात जेवण्याने बऱ्या होतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)