भात उरलाय? थांब सकाळी उठून फोडणीचा भात करू. पोळी उरलीये? मस्त गरम करून कडक करून खाऊ! सकाळचा चहा जास्तच मापात बनवला होता जाऊदे संध्याकाळी गरम करून पिऊन घेऊ.
आहार तज्ज्ञ सांगतात की, काही पदार्थांना पुन्हा गरम केल्याने होणारे घातक परिणाम सांगितले आहेत. केवळ चव व पोतच नव्हे तर पौष्टिक मूल्य कमी करण्यासाठी, अन्नातून विषबाधा होण्यासाठी सुद्धा हे ‘रिहिटिंग’ कारण ठरू शकतं.
चहा बनवल्यावर बराच वेळ तसाच राहिल्यास चहा आम्लयुक्त होऊ शकतो. ॲसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या असल्यास खूप वेळ ठेवलेला, थंड झालेला किंवा पुन्हा गरम केलेला चहा चुकूनही पिऊ नये.
पालक पुन्हा गरम केल्याने व्हिटॅमिन सी आणि बी यांसारखी पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे कमी होऊ शकतात, ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते.
जेव्हा स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केले जाते तेव्हा त्यात रासायनिक बदल होतात ज्यामुळे त्याची गुणवत्ता खराब होऊ शकते.
मशरूम सच्छिद्र असतात आणि ते सहजपणे ओलावा शोषून घेतात परिणामी यात जिवाणूंची वाढ लगेच होते. जी पुन्हा गरम केल्यावर एन्झाईमॅटिक प्रतिक्रिया देऊ शकतात, याने पदार्थाची चव आणि पोत बदलू शकते.
भात पुन्हा गरम केल्याने हे घातक जीवाणू बाहेर पडतात, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. पुन्हा गरम केलेला भात कोरडा सुद्धा पडतो ज्यामुळे पचनक्षमता कमी होऊ शकते. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची पुष्टी करत नाही. इथं तज्ज्ञांनी दिलेला सल्ला अवलंबण्यापूर्वी माहितीची खातरजमा करून घ्या. )