कधीच कोणावर विश्वास ठेवू नका. ऑफिसमधील मित्रांनाही तुमचे सिक्रेट सांगू नका. कधी वाद झाल्यास रागाच्या भरात तो तुमचे सिक्रेट उजेडात आणू शकतो.
ज्यांना तुमच्या कामाची व तुमच्या मेहनतीची कदर आहे. त्यांनाच मदत करा. तुमचा फायदा उठवणाऱ्या माणसांपासून दूर राहा
कोणाशीही बोलताना सावध राहा. कारण तुमच्या एका वाक्याचा गैरअर्थ काढून तुम्हालाच दोषी ठरवलं जाऊ शकतं.
तुम्ही पुढे काय करणार आहात आणि तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत हे कधीच कोणापुढे जाहीर करु नका. लोक त्याचा फायदा उचलतात.
जे लोक दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात किंवा एखाद्याच्या वाइटावर टपलेले आहेत. त्यांच्यापासून आत्ताच लांब राहा.
तुम्ही दुसऱ्याला मान-सन्मान दिलात तरच तुम्हाला बदल्यात मान सन्मान मिळेल.
कामाच्या प्रती इमानदार राहा. पूर्ण जबाबदारीने तुमचं काम करा. म्हणजेच कोणीच तुमच्यावर आरोप करु शकणार नाही.