फ्रेंडशिप डे हा सर्वच मित्र मैत्रिणींसाठी खास दिवस असतो.या दिवशी बरेचजण आपल्या मित्रांना खास भेटवस्तू देऊन सुखद आठवणी तयार करतात, ज्या आयुष्यभर सोबत राहतात.
काही देशांमध्ये फ्रेंडशिप डे 30जुलैला साजरा करण्यात आला तर भारतामध्ये 4 ऑगस्टला साजरा होणार आहे.
मैत्री हे खूप खास आणि अतूट नातं आहे. जर तुम्हालासुद्धा तुमचा हा दिवस खास बनवायचा असेल तर तुम्ही या भेटवस्तू तुमच्या मित्राला देऊ शकता.
जर तुमचा एखादा चांगला फोटो असेल तर तुम्ही फोटो फ्रेम देऊ शकता.या फ्रेममुळे तुमच्या आठवणी आणखी घट्ट राहतील.
जर तुम्हाला अशी भेय द्यायची आहे जी तुमच्या मित्राला नेहमी लक्षात राहीस तर डेकोरेशन प्लांट हा सर्वात चांगला पर्याय आहे.
जर तुम्हाला फोटोफ्रेम द्यायची नसेल तर फोटो बुक किंवा फोटो अल्बम हा चांगला पर्याय असू शकतो. तुमचे प्रत्येक खास क्षणाचे फोटो तुम्ही त्यामध्ये टाकू शकता.
मित्रासाठी भावनांपेक्षा चांगली भेट कोणतीच नसू शकते. तुम्ही एखादं ग्रीटींग कार्ड स्वत: बनवून किंवा विकत घेऊन मित्राला देऊ शकता.