यंदा 4 ऑगस्ट रोजी दीप अमावस्या साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते.
तुम्हालासुद्धा तुमच्या घरातील पितळ्याचे, चांदीचे , तांब्याचे दिवस साफ करायचे आहे तर 'या' ट्रिक्स नक्की वापरा.
तांब्याच्या आणि पितळ्याच्या दिव्यांवरील काळपटपणा काढून टाकण्यासाठी व्हिनेगर हा उत्तम मार्ग आहे. यामुळे तुम्ही सहजपणे भांडी स्वच्छ करू शकता. पितळेच्या भांड्यांवर व्हिनेगर लावून त्यावर मीठ चोळा आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवा.
पितळ्याच्या दिव्यांवरील हरवलेली चमक परत आणण्यासाठी चिंच वापरून पहा. 15 मिनिटे चिंच पाण्यात भिजवून ठेवा. चिंचेचा कोळ काढून त्या लगद्याने दिवे साफ करू शकता.
पितळेचे दिवे चमकवण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून लावा. त्यानंतर दिवे कोमट पाण्याने धुवा. असे केल्यास दिवे पूर्णपणे साफ होतात.
पितळेच्या दिव्यांवर लिंबू आणि मीठाचे मिश्रण एकत्र करून लावा आणि नंतर गरम पाण्याने धुवा.असे केल्याने दिव्यांची चमक पुन्हा येते.