एखाद्या घटनेत तुम्हाला कोणतीही माहिती नसताना व्यक्त होवू नका. त्यामुळे अशा परिस्थितीत आधी माहिती घ्या आणि नंतर व्यक्त व्हा.
नातेसंबंध दृढ होणार असतील तर मौन बाळगण्याला प्राधान्य देवून कायम शांत राहा.
आरडा ओरडा करुन मोठ मोठ्याने बोलून तुमचं मैत्री खराब होईल अशा वेळी शांत राहा.
आपल्या वागल्याने समोरच्याचा भावनेला ठेच पोहचणार असेल तर शांत राहणं गरजेच आहे.
भावनेच्या भरात आपण अनेक वेळा चुकीचे निर्णय घेतात. रागात अनेक गोष्टी, नाती तुटून जातात म्हणून अशावेळी शांत राहा.
तुमचा पारा चढला असेल आणि तुम्ही ओरडल्याशिवाय बोलता येत नसेल आणि अशावेळी वातावरण खराब होईल म्हणून तुम्ही शांत राहणे फायद्याचं ठरतं.