मधुमेह म्हणजेच डायबेटीजच्या रुग्णांची संख्या जगभरात झपाट्याने वाढत आहे.
मधुमेह हे एक मेटाबायोटीक आजार आहे. यामध्ये इन्शुलिनची पुरेश्याप्रमाणात निर्मिती होत नाही.
इन्शुलिनच्या कमतरतेमुळे रक्तामधील साखरेचं प्रमाण वाढतं. त्याचा परिणाम हृदय, किडनी आणि डोळ्यांवर परिणाम होतो.
ज्यांना टाइप-2 डायबेटीज असतो त्यांना आपल्याला ही समस्या आहे हे समजण्यासाठीच फार वेळ जातो.
म्हणूनच आपण अशा 10 लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या माध्यमातून टाइप-2 डायबेटीज असल्याचं स्पष्ट होतं...
सतत तहान लागणे हे डायबेटीजचं पहिलं सर्व सामान्य लक्षणं आहे. अशा स्थितीत वारंवार तोंड कोरडं पडतं.
अचानक जास्त भूक लागणे आणि गोड खाण्याची इच्छा होणे हे सुद्धा डायबेटीजचं लक्षण आहे.
तुमच्या शरीरामधील साखरेचं प्रमाण कमी होतं तेव्हा तुमचं शरीर तुम्हाला अधिक खाण्याची गरज आहे असे संकेत देते.
तुम्ही भरपूर खाता मात्र तुमचं वजन कमी होत असेल तर हे डायबेटीजचे लक्षण आहे असं समजावं.
वारंवार तुम्हाला लघवीला जावे लागत असेल तर ही समस्या डायबेटीजकडे लक्ष वेधते.
कोणतेही कारण नसताना मूड स्वींग होणे हे सुद्धा डायबेटीज असल्याचं लक्षण आहे.
डायबेटीजची समस्या असलेल्यांना वारंवार झोप लागणे आणि निद्रावस्थेत असण्याची समस्याही भेडसावते.
पाय सुन्न पडणं आणि वेदना होणे यासारख्या गोष्टीही डायबेटीजकडे इशारा करतात.
तुम्हाला जखम झाली असेल आणि ती लगेच भरुन निघत नसेल तर तातडीने डॉक्टरांना भेटा. हे डायबेटीजचं लक्षण आहे.
तुम्हाला फार थकवा जाणवत असेल किंवा धूसर दिसत असेल अथवा रक्तदाब वाढला असेल तर ही सुद्धा डायबेटीजची लक्षणं आहेत असं समजावं.